Breaking News

खर्‍या गरजूपर्यंन्त लायनेसचे मदतीचे हात पोहचत आहे -गिरीश मालपाणी

खर्‍या गरजूपर्यंन्त लायनेसचे मदतीचे हात पोहचत आहे. महिलांनी एक पाऊल पुढे टाकत सामाजिक कामात मोठे योगदान दिले आहे. वंचित घटकांच्या सर्वांगीन विकासासाठी लायनेस क्लबचे उपक्रम प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार लायन्सचे प्रांतपाल गिरीश मालपाणी यांनी काढले. 


लायनेस क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्य करणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील महामानव बाबा आमटे वसतिगृहास दोन पाण्याच्या टाक्या व कपाटांची भेट देण्यात आली. यावेळी मालपाणी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिजन चेअरमन संदिप कोयटे लायनेसच्या अध्यक्षा लतिका पवार, राजश्री मांढरे, अमल ससे, सुरेखा कडूस, शोभा भालसिंग, रेखा भोईटे, सुनंदा तांबे आदि उपस्थित होत्या.
प्रांतपाल गिरीश मालपाणी व रिजन चेअरमन संदिप कोयटे यांच्या हस्ते वसतीगृहाचे संचालक अनंत झेंडे यांच्याकडे पाण्याच्या टाक्या व कपाट सुपुर्द करण्यात आले. संदिप कोयटे यांनी महिलांनी राबविलेले उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगून, महिलांनी सामाजिक चळवळीत पुढाकार घेतल्यास बदल घडणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. लतिका पवार म्हणाल्या की, महामानव बाबा आमटे वसतिगृहात आदिवासी, पारधी आदि वंचित घटकाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या संस्थेच्या माध्यमातून सुजान भावी पिढी घडणार असून, या कार्याला सामाजिक उत्तरदायित्व या भावनेने लायनेसच्या महिला सदस्यांनी मदत केल्याचे स्पष्ट केले.