Breaking News

भक्ती सुख प्रत्येक क्षणा क्षणाला वाढत जाते- आदिनाथ महाराज


भातकुडगाव / प्रतिनिधी/ - आपण चांगले कर्म करून पुण्य मिळवून भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी अहंकार बाजूला ठेवून भक्ती केली. पाहिजे त्यातूनच क्षणाक्षणाला आनंदाची प्राप्ती होते. पंथ व जाती बाजूला ठेवून मानवतेचे पुजारी बनले पाहिजे असे प्रतिपादन आदिनाथ महाराज फपाळ माजलगांवकर यांनी व्यक्त केले. शेवगाव नेवासा राज मार्गावरील भायगाव येथे महंत भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने चालू असलेल्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे पाहिले पुष्प गुंफतांना महाराज बोलत होते. समाजातील प्रत्येक गोष्टीची उत्तर धर्मशास्त्रात आहे. त्यासाठी आपली बौद्धिक पातळी वाढून आपण जीवन जगल पाहिजे. समाजामध्ये चांगल्या वाईटचे वर्गीकरण करण्याचं काम भगवंताच आहे. आपण आपले कर्म करीत राहिल्यास आपणास फल प्राप्ती होते. चालू असलेल्या ग्रामीण भागातील सुवर्ण महोत्सवी सप्ताहाचे महाराजांनी तोंड भरून कैतुक केले. धर्माच्या ध्वजाखाली समाज एकत्र येतो हे या सप्ताहातील कार्यक्रमातून दिसत आहे. चालू अन्नदान व ज्ञानदान हे या सप्ताहाच्या कार्यक्रमाचे वैभव वाढवत आहे. या वेळी गहिनीनाथ महाराज आढाव , दत्तात्रय महाराज कुलट, हरिभाऊ महाराज अकोलकर माजी सरपंच किसनराव लांडे, माजी चेअरमन जनार्धन लांडे, पांडुरंग दुकळे, दिगंबर शिलेदार, पंढरीनाथ लांडे, जगन्नाथ आढाव, सखाराम शेकडे, विठ्ठल आढाव, बाप्पूराव दुकळे, पांडुरंग आढाव, महेश महाराज शेळके, कानिफनाथ दुकळे, प्रतिभा महाराज शेळके, धोंडीराम ढोरकुले, भाऊसाहेब फटांगरे, बाबासाहेब शेळके, ज्ञानदेव नेव्हल, रमेश आढाव, शंकर दुकळे, लक्ष्मण आढाव, नानासाहेब दुकळे, श्रीराम शेकडे, पंढरीनाथ आढाव, गोरक्षनाथ काळे, राजेंद्र दुकळे, विष्णू उभेदळ, संदीप लांडे, विजय खेडकर, बबन लटपटे, हरिचन्द्र आढाव, मुरलीधर आढाव, रंगनाथ कमानदार, सुखदेव शिंदे ,मारुती शेकडे, निवृत्ती आढाव, महादेव दुकळे, डॉ धावणे , शहाराम आगळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.