Breaking News

पाणी टाकीच्या निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी

तालुक्यातील कापरेवाडी येथील पाण्याच्या टाकीच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी अशी मागणी येथील बजरंग कदम यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.कापरेवाडी येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असुन हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असुन या कामावर सिमेंटचे प्रमाण अत्यल्प आहे. वाळू ही माती मिश्रीत असुन ती जवळील ओढयातील असल्याने वाळू निकृष्ट आहे. त्याचबरोबर या बांधकामावर पाणी मारले जात नाही. तसेच टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे हे काम त्वरीत बंद करून ठेकेदारावर कारवाई करावी अशीही मागणी बजरंग कदम यांनी केली आहे. कापरेवाडी गावचा जिव्हाळ्याचा व कायमस्वरूपी पाणी टंचाईवर मात करणारा विषय असल्याने वेळी लक्ष घालावे अशी ही कदम यांनी मागणी केली आहे.