Breaking News

शिवसेनेची तालुका कार्यकारणी बरखास्त; नवे पदाधिकारी जाहीर

पारनेर तालुक्यातील शिवसेनेची जूनी कार्यकारिणी सोमवारी सायंकाळी 5 वाजता बरखास्त करण्यात आली. याच वेळी नवी कार्यकारिणी करण्यात आली . जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले व तालुकाप्रमुख विकास रोहकले यांनी नव्या पदाधिकार्‍यांच्या नावाची घोषणा करून त्यांना नियुक्ती पत्र दिले.


माजी तालुका प्रमुख निलेश लंके यांची शिवसेनेतून केलेल्या हकालपट्टीला दोन दिवस झाले नाही, तोच त्यांनी नियुक्त केलेली तालुका कार्यकारिणी देखील आमदार औटी यांच्या सांगण्यावरून बरखास्त करण्यात आली. लंकेंनी नियुक्त केलेल्या कार्यकारिणीत लंके समर्थक असल्याने ही कार्यकारणी बरखास्त केली गेल्याचे बोलले जात आहे. याचवेळी नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली असून, त्यात 3 उपतालुकाप्रमुखांसह सहा विभाग प्रमुखांचा समावेश आहे. जयसिंग धोत्रे, किसन सुपेकर व संतोष येवले यांची उपतालुकाप्रमुख म्हणून तर सखाराम उजागरे, अप्पासाहेब देशमुख, अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब रेपाळे, अरूण भाऊ कळमकर व अनिकेत देशमाने यांची विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे पदाधिकारी उपविभागप्रमुख तसेच शाखाप्रमुखांची नेमणूक करून येत्या आठ दिवसांत उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखांना अहवाल सादर करणार आहेत.
लंके यांची हकालपट्टी केल्याने व आता त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना व त्यांनी यापूर्वी स्थापन केलेल्या तालुक्यातील शिवसेनेच्या शाखा व त्यातील पदाधिकारी यांना कार्यकारनीतून वगळ्यांने हे कार्यकर्ते काय भूमिका घेतात. हे महत्वाचे असणार आहे.