Breaking News

साईबाबांचा पोवाडा लवकरच इंटरनेटवर


साईबाबांची मंहती सांगणारा पोवाडा प्रवरानगर येथील किशोर सासवडे यांनी तयार केला आहे. हा पोवाडा लवकरच इंटरनेटद्वारे प्रसारित होणार आहे. साईबाबांनी चमत्कारातून लोकांना भक्तीमार्गाला लावले. अनेकांना अध्यात्माकडे वळविले. त्यापेक्षाही एक महत्वाचे काम बाबांनी केले, ते म्हणजे माणूस घडविणे आणि समाज परिवर्तन करणे हे होय. हीच शिकवण सासवडे यांनी पोवाड्यांच्या माध्यमातून जगभर दिली आहे. 
ते म्हणाले, साईबाबा शिस्त लावणारे एक लोकशिक्षक होते. अशा अनेक कथा बाबांच्या सांगितल्या जातात. या कथा पोवड्यांच्या माध्यमातून गायन करण्यात आले आहे. साईबाबा जन्मसमाधी सोहळ्यानिमित्त हा एक वेगळा विषय साईभक्तांपर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून आता संपूर्ण जगामध्ये जाणार आहे.साईबाबांनी केलेले काम त्यांचं कार्य आणि साईबाबा शताब्दीनिमित्त होणारा उत्सव त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात आलेले भक्त त्याचबरोबर साईबाबा हे लोक शिक्षक कसे होते, साईबाबांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण कशी दिली याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न सासवडे यांनी केला आहे.