Breaking News

पारनेर सांस्कृतिक महोत्सवात अळकुटी महाविद्यालयाचे यश

लेक वाचवा अभियानांतर्गत पारनेर सांस्कृतिक महोत्सव सिनेतारका अमृता खानविलकर तसेच जनसेवा फाऊंडेशनचे डॉ. सुजय विखे, तालुका युवा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे, पुष्पा वराळ, राहूल झावरे, महेश शिरोळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पारनेर सांस्कृतिक महोत्सवामध्ये पारनेर तालुक्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अळकुटी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समुह नृत्य प्रकारामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. रोख रक्कम 3000 रु., सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरुप होते.
समुहनृत्य प्रकारामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी किरण बांगर, दिगंबर गागरे, रवि लाळगे, कानिफनाथ फुलमाळी, अंकिता शिंदे, प्रियंका भंडारी, पल्लवी पानमंद, अपर्णा कापसे या विद्यार्थ्यांनी अळकुटी महाविद्यालयाचे नाव उंचावले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. हे यश संपादन करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सुनिता जाधव, प्रा. कुंदा कवडे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.