Breaking News

श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालयातील 56 विद्यार्थ्यांची निवड

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाच्या श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. महेश गोलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नोकर भरती मेळावा नुकताच पार पडला. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागामार्फत आयोजित कॅम्पस मुलाखतीमध्ये 56 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीत सामावून घेतले. अशी माहिती अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण घोडके यांनी दिली.

श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय एचएससी लोकेशन विभागातर्फे कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात येऊन, मुलाखती घेण्यासाठी पुणे येथील टाटा मोटर्स, भारत फोर्ज, कळ्यांनी मर्स, एलजी इलेक्ट्रॉनिक्स, डीएचएल सप्लाय चेन, जॉन डिअर, आदी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुलाखतींमध्ये श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय व्होकेशनल विभागातील 35 व ना. भा. तांबे कनिष्ठ महाविद्यालय जामखेड, वृद्धेश्‍वर कनिष्ठ महाविद्यालय तिसगाव, कडा कॉलेज येथील 21 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन त्यांना नामांकित कंपन्यांत सामावून घेतले.
निवड झालेल्या उमेदवारांचे संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर, मा. पं. स. सदस्य विजयसिंह गोलेकर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण घोडके यांनी अभिनंदन केले.
कॅम्पस मुलाखती यशस्वी करण्यासाठी व्होकेशनल विभागाचे समन्वयक प्रा. चंद्रकिशोर बारटक्के, प्रा. डॉ. भारत मेंगडे, प्रा. वैशाली कुलकर्णी, प्रा. आदिनाथ खेडकर, विकास पाटील व नागोसे शरद मामा आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास खर्डा येथील सरपंच संजय गोपाळघरे, सेंट्रल बँकेचे मयुर लोणकर पत्रकार संतोष थोरात, गणेश जव्हेरी, संस्थेच्या संचालिका चंदाताई गोलेकर तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे.