हिमाचलमधील गावात अग्नितांडव
शिमला - येथील रोहडूजवळील कुशैनी गावात पहाटे 3 वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत 41 घरे जळून खाक झाली आहेत. आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. कुशैनी गावात 150 ते 200 घरांची वस्ती आहे. पहाटे तीन वाजताच्या सुमारास घरांना आग लागल्याची बातमी कळताच पोलीस दल गावात दाखल झाले. गावकरी व पोलिसांनी अथक परिश्रमाने आग विझवली.