Breaking News

एटीएमवरील रोकड टंचाई तक्रारी सरकार व रिझर्व्ह बँकेने केल्या दुर्लक्षित


एटीएमवरील रोकड टंचाईबाबत उडालेल्या गोंधळामुळे सर्वच ठिकाणी लोकांची मोठी पंचाईत झाली. ते लक्षात घेऊन केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेने लक्ष दिल्यानंतर आता ८६ टक्के एटीएममध्ये पैसे पोहोचले असल्याचा दावा केला जात आहे. मात्र तरीही गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण झालेल्या या स्थितीबाबत आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या सरकारांनी याची माहिती दिली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले असल्याचा आरोप केला जात आहे.फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थ मंत्रालय व रिझर्व्ह बँकेला आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्य सरकारांनी पत्र लिहून लक्ष वेधले होते. तसेच या अडचणीचे तातडीने निराकरण करण्यासही सांगण्यात आले होते. जर यावर तातडीने लक्ष दिले नाही, तर मोठी व्यापक व गंभीर समस्या निर्माण होईल, असेही पत्रात म्हटले होते. मात्र रिझर्व्ह बँक व अर्थ मंत्रालयाने हा मुद्दा साधारण असल्याचे मानले असावे व त्याबाबत गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने देशातील विविध राज्यांमध्ये एटीएममध्ये नोटबंदी आली असल्याचा दावा केला जात आहे..