गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या
अहमदनगर शहरातील दिल्लीगेट परिसरातील मानकर गल्ली येथे टेलरींगचे काम करणाऱ्या संदीप मारुती आंबेकर (वय ४०) यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संदीप आंबेकर हे अनेक दिवसांपासून नालेगाव येथील मानकर गल्लीत राहत होते.