Breaking News

पंढरपूरचे कवी रवी सोनार यांच्या काव्यसंग्रहाची लिम्का बुकमध्ये नोंद

सोलापूर, दि. 12, एप्रिल - पंढरपूर येथील कवी रवी सोनार यांच्या सखीसोबती... क्षणवैविध्यांची गुंफण या कवितेची लिम्का बुकमध्ये नोंद झाल्याची माहिती कवी रवी सोनार यांनी पत्रकार प रिषदेत दिली. शिवप्रज्ञा प्रकाशन, सोलापूर यांनी प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहाची दीर्घ शीर्षकामुळे द लाँगेस्ट टायटल ऑफ बुक अशी नोंद झाली आहे. सखीसोबती... या काव्यसंग्रहाच्या शीर्षक ामध्ये 2 हजार 57 शब्द आणि 6 हजार 76 अक्षरे आहेत. यापूर्वी विक्रम 1100 शब्द आणि 45 अक्षरांचा होता. लिम्का बुकने कवी सोनार यांना तसे प्रमाणपत्रही दिले आहे. कवी सोनार यांच्या काव्यसंग्रहात त्यांच्या पत्नीस पाहायला गेल्यापासून ते लग्नाच्या 18 व्या वाढदिवसापर्यंतच्या कालावधीतील ठळक आणि महत्त्वपूर्ण आठवणींचा आशय शब्दांतून मांडला आहे. द्विपदी, क्षणिका, हायकू, चारोळी आणि प्रश्‍नांतिक त्रिवेणी या पाच काव्यात्मक साहित्यिक आकृतीबंधात गुंफलेला आहे.