Breaking News

डायनामीक अकादमीच्या अविष्कार समर कॅम्पचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग व्यक्तिमत्त्व विकासासाठी व्हावा म्हणून येथील डायनामिक आर्ट अकॅडमीच्या वतीने अविष्कार समर कॅम्पचे दि.17 ते 27 एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले असून या उन्हाळी छंद वर्ग शिबिरात ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या वैभवशाली इतिहास दर्शनासह नावीन्यपूर्ण कलांच्या भरगच्च प्रात्यक्षिकासह मुलांना लाभ घेता येणार आहे.


सावेडीच्या मुला-मुलींसाठी माऊली सभागृहाशेजारील सेंट मोनिका डीएड कॉलेजमध्ये सकाळी 8 ते 11 व नगर शहरातील मुला-मुलींसाठी माळीवाडा येथील महात्मा फुले छात्रालयात दु.4 ते 7 या कालावधीत आविष्कार शिबिर संपन्न होणार आहे. यामध्ये बासरीवादन, स्टोनआर्ट, खडूशिल्प, स्कीवलींग, फॅशन मॉडेलिंग, कॅलिग्राफी, रांगोळी, मेहंदी, चारकोल पेंटिंग, पारंपारिक व मनोरंजक खेळ, परदेशी वाद्ये प्रदर्शन, लेझीम, लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, विपश्यना, योगासने, भाषण, सूत्रसंचालन आदी कलांबाबत मार्गदर्शन व प्रात्याक्षिके मुलांकडून करून घेतली जाणार आहेत. आपल्या नगरबद्दल आत्मीयता अभिमान वाढावा म्हणून नगरमधील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती चित्रप्रदर्शन, स्लाईड शो व निवडक ठिकाणांना भेटी आदी नावीन्यपूर्ण उपक्रमांचा यात समावेश आहे.
झी सारेगमप लिटल चॅम्प अंजली व नंदिनी गायकवाड, घुमा-चरनदास चोर सिनेमा फेम बालकलाकार आदेश आवारे, हरहुन्नरी कलाकार अमोल बागूल, फॅशन डिजाईनर मोहसीन शेख, डीआयडी डान्सशो कलाकार गणेश ढोले आदी कलाकार मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. या कॅम्पमध्ये सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांनी टोपी, रुमाल, पाणी, डबा दररोज आणायचा असून नांवनोंदणीसाठी 7385522622 आणि 8975933885 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.