निलक्रांती चौकात भीमगीतांच्या बहारदार कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध
जगातली लेखनी बाई मी भिमाची लेखनी..., सुटाबुटात आले भिमराव..., तुला भिमान बनवल वाघ... या गीतांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. माझ्या भिमाच्या नावाच कुंकू लावील रमान... या गीताला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले व संगीत सितारे कार्यक्रमात हिंदी गितांची मैफल रंगली होती. तर ठसकेदार लावणीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या कार्यक्रमाचे प्रारंभ अॅड.गणेश पाखरे, प्रा.जयंत गायकवाड व भिम महोत्सव समितीचे संयोजक अजय साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महेश भोसले, गणेश पाखरे, भीमराव पगारे, विलास साठे, निलक्रांती मित्र मंडळाचे भाऊ साळवे, गिरीश जाधव, सलिम शेख, विनोद भिंगारदिवे, सुमेध गायकवाड, अशोक भिंगारे, दिलीप ठोकळ, विनोद भिंगारदिवे आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलक्रांती चौक मित्र मंडळ, फुले, शाहू आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.