Breaking News

‘जैश-ए-मोहम्मद’च्या कमांडर मुफ्ती यासिरचा खात्मा


श्रीनगर : ‘जैश-ए-मोहम्मद’चा कमांडर मुफ्ती यासिर याला भारतीय जवानांनी यमसदनी धाडले आहे. यासिर हा कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अझहर याचा प्रमुख साथीदार समजला जातो. गेल्या 12 तासांपासून त्राल परिसरात ही चकमक सुरू होती. यात 4 दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले. चकमकीत भारतीय लष्कराचा 1 जवान तसेच पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. मौलाना मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा मुख्य आहे. मसूद अझहर याने 31 जानेवारी 2000 रोजी जैश-ए-मोहम्मद या संघटनेची स्थापना केली. जैश-ए-मोहम्मद म्हणजे प्रेषितांचे सैन्य. कंदहार विमान अपहरण प्रकरणात भारताने अझहर याची मुक्तता केली होती.