Breaking News

60 नक्षलवाद्यांचे शस्त्रासह आत्मसमर्पण


नारायणपूर : बस्तरमध्ये संघटनेच्या कामावर नाराज 60 नक्षलवाद्यांनी आपल्या हत्यारांसह आत्मसमर्पण केले आहे. 40 युवक आणि 20 युवतींनी पोलीस महानिरिक्षक विवेकानंद सिन्हा यांच्यासमोर अबूझमाड परिसरात आत्मसमर्पण केले. यावेळी आत्मसमर्पण करणार्‍या नक्षलवाद्यांनी आपल्यासोबत 7 गोळ्यांनी भरलेल्या बंदूका देखील जमा केल्या. आत्मसमर्पण करणार्‍या नक्षलवाद्यांनी ते संघटनेच्या अंतर्गत रणनितीला कंटाळल्याचे सांगितले. आत्मसमर्पण करणार्‍यांना सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार मदत दिली जाणार आहे. सुरक्षा दलासाठी आणि सरकारसाठी ही खूप चांगली बातमी आहे. काही दिवसांपुर्वीच संघटनेच्या कामकाजाने वैतागलेल्या अनेक नक्षलवाद्यांनी संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतला होता. गडचिरोलीमध्ये 2 दिवसांपुर्वीच सुरक्षादलांनी 37 नक्षलवाद्यांना ठार केले होते. त्यानंतर आता छत्तीसगडमधून देखील ही चांगली बातमी आली आहे.