Breaking News

आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणारे दोघे ताब्यात

आयपीएल मॅचेसवर सट्टा लावणाऱ्या दोघा जणांना ताब्यात घेण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून याप्रकरणी १ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महेश जगन्नाथ बल (वय २०, रा. केडगाव, नगर), परमेश्वर रावसाहेब पवार (वय २९, रा. नालेगाव, नगर) हे दोघे राहत्या घरात किंग्ज इलेव्हन पंजाब व चेन्नई सुपर किंग या दोन संघांमध्ये चालू असलेल्या क्रिकेट सामन्याच्या हार-जीत, खेळाडूचे रन व विकेट यावर मोबाईल फोन व लॅपटॉपवरून रक्कम लावून क्रिकेट बेटींग नावाचा जुगार चालवत होते.