Breaking News

आंध्र प्रदेशात राज्यव्यापी बंद; टीडीपीचा बंदला विरोध

विशाखापट्टणम - आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवरून आंध्र प्रदेश प्रत्येक होडा साधना समितीने आज राज्यव्यापी बंद घोषित केला आहे. या बंदला वायएसआरसीपी, जन सेना, काँग्रेस व इतर डाव्या पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. तेलुगु देसम पक्षाने मात्र बंदला विरोध दर्शवला आहे. राज्यव्यापी बंदचा फटका 30 जिल्ह्यांना बसला आहे. राज्यातील बस सुविधा ठप्प असल्याचे चित्र आहे. सर्व प्रमुख बाजारपेठा बंद आहेत. बंद समर्थकांनी केंद्र सरकारच्या विरोधात बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. कोलकाता व चेन्नईला जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्ग 16वर डाव्या पक्षांतर्फे निदर्शने सुरू आहेत. राज्यातील रेल्वे सुविधा मात्र सुरळीत असल्याचे वृत्त आहे.