Breaking News

मार्च तिमाहीत ७.४१ लाख कोटींचे जीएसटी संकलन

जुलै २०१७ मध्ये लागू झालेल्या वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) सरकारला ७.४१ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. यात जुलैपासून फेब्रुवारीपर्यंतच्या विक्रीची पूर्ण आकडेवारी आहे. मात्र, मार्च महिन्यातील केवळ आयातीवर लावण्यात येणाऱ्या आयजीएसटी आणि सेसचा समावेश करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. 


वास्तविक प्रत्येक महिन्यात देशात होणाऱ्या विक्रीवर केंद्रीय जीएसटी, राज्य जीएसटी आणि इंटिग्रेटेड जीएसटी तसेच सेस लावला जातो, त्याची रिटर्न फायलिंग पुढील महिन्यात होते. म्हणजेच मार्च महिन्यातील कर एप्रिल महिन्यात जमा होईल. आयातीवर आयजीएसटी आणि सेसचा हिशेब मात्र त्याच महिन्यात होतो.