Breaking News

पश्‍चिम बंगालमध्ये टीएमसी, भाजपमध्ये राडा

कोलकाता : तृणमुल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आज झालेल्या राड्यात पश्‍चिम बंगालमध्ये 25 जण जखमी झाले आहेत. उत्तर बंगालमधली जलपैगुरी येथे उमेदवारी भरण्यावरून झालेल्या वादामुळे हा संघर्ष झाला. वृत्तांनुसार टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर या वादातून भाजपचे पक्ष कार्यालय पेटवण्याचा आरोप आहे. अन्य एका घटनेत बिरभूम जिल्ह्यात पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. पश्‍चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकींना एक महिना शिल्लक रा हिला असताना संघर्ष व अस्वस्थता वाढतच असल्याचे दिसत आहे.