Breaking News

9 शेतमजूर महिलांचा मृत्यू

नालगोंडा - शेतकरी महिला मजुरांचा ट्रॅक्टर कॅनॉलमध्ये कोसळल्याने 9 महिलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना नालगोंडा येथीन 50 किमी अंतरावरील असलेल्या वाड्डीपटला या गावात घडली आहे. रामवत सोना (70), रामावथ जेजा (65), जारुकुला द्वाली (30), रामावथ केली (50), रामावथ कमसाली (50), बनावथ बेरी (55), रामावथ भारती (35) आणि रामावत सुनीता (30) अशी मृत महिलांची नावे आहेत. ट्रॅक्टरची ट्रॉलीच अलिमीनेटी माधाव रेड्डी प्रकल्प (एएमआरपी) कॅनॉलमध्ये पडल्याची महिती सुत्राने दिली आहे. हा अपघात घडला तेव्हा या ट्रॉलीमध्ये जवळपास 30 शेतकरी मजूर होते.