Breaking News

नवरदेवासह 6 वर्‍हाडींचा अपघाती मृत्यू

सतना/वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात नवरदेव आणि वर्‍हाडी असलेली कार समोरून येणार्‍या ट्रकला धडकली. धडकेनंतर कार एका खड्ड्यात गेली आणि तिच्यावर ट्रकही पलटी झाला. या अपघातात नवरदेवासह सहाजणांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. अमरपाटनच्या उमराही टोलाहून कोल कुटुंबीयांचे वर्‍हाड मैहरच्या अमिलिया येथे जात होती. तेव्हा शुक्रवारी रात्री उ शिरा अमरपाटन-मैहर मार्गावर नरौरा गावाजवळ या कारची ट्रकबरोबर धडक झाली. घटनेनंतर कार एका खड्यात गेली आणि तिच्यावर ट्रकही सपडला. यामुळे कारचा पार चुराडा झाला आहे, अशी मा हिती पोलीस अधिकारी अरविंद तिवारी यांनी दिली. या अपघातात नवरदेव ब्रजमोहन कोलसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण तखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. वर्‍हाडींचे मृतदेह कारमध्ये एवढ्या वाइट पणे आडकले होते, की त्यांना क ाढण्यासाठी आधी कार गॅस कटरने कापावी लागली, असेही तिवारी यांनी सांगितले.