Breaking News

फुटीरतावादी नेता यासिन मलिक पोलिसांच्या ताब्यात

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेलएफ) प्रमुख मोहम्मद यासिन मलिक याला आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते फुटीरतावाद्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. जेकएलएफच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की मलिक जॉईंट रेजिस्टंन्स लिडरशीपने (जेआरएल) आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जुन्या शहरातील नोवहट्टा परिसरात जात असताना पोलिसांनी रस्त्यामध्ये त्याची गाडी थांबवून त्याला ताब्यात घेतले. हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मीरवाईज उमर फारूख याने मलिकला ताब्यात घेत असतानाचा फोटो ट्विट करत पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. आपल्या ट्विटमध्ये फारूख यांनी म्हटले आहे, की जामा मस्जीद येथे तरुणांची हत्या, विद्यार्थ्यांवर बळाचा वापर आणि सातत्याने नेत्यांवर एनआयएची बेकायदेशीर कारवाई यांच्या विरोधात आंदोलनात आयोजित करण्यात आले होते. या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असाताना जेकेएलएफ प्रमुख यासिन मलिक याला ताब्यात घेतले. पोलिसांत्या अत्याचाराचा, वर्तणुकीचा आणि अटकेचा तीव्र निषेध, असे फारूख यानी म्हटले आहे.