Breaking News

कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध


हुबळी/वृत्तसंस्था : कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. कर्नाटकमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. यात का ँग्रेसने एकूण 4 जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. हे जाहीरनामे प्रत्येक ब्लॉक्स, जिल्हे आणि कम्युनिटीला लक्षात ठेऊन तयार करण्यात आले आहे. ’प्रत्येक राज्यातील लोकांपर्यंत पोहचून आम्ही त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्यानुसारचं जाहीरनामे तयार करण्यात आले’ असल्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
‘या जाहीरनाम्यात लिहलेल्या प्रत्येक गोष्टी आम्ही करून दाखवणार. मागच्या जाहीरनाम्यातली 95 टक्के कामं आम्ही करून दाखवली आहेत’ असं म्हणत राहुल गांधी यांनी जनतेला विश्‍वास देण्याचा प्रयत्न केला आहे. ’तुम्ही पाहिलं असेल भाजपचा जाहीरनामा हा 3-4 लोकांना सोबत घेऊन बनवला जातो. त्यांच्या जाहीरनाम्यात भ्रष्टाचार, रेड्डी ब्रदर्सच्य संक ल्पना असतात. भाजपचा जाहीरनामा म्हणजे आरएसएसचा जाहीरनामा असतो’, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाना साधला आहे.
जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे
- मुलींसाठी मोफत पदव्युत्तर शिक्षण
- शहरी भागात स्वस्त घरे
- शहरांतील झोपडपट्ट्यांचा विकास 
- वाहतूक व्यवस्थेत सुधारणा
- अल्पसंख्याकांचा सामाजिक-आर्थिक विकास
- प्रत्येक घराला पिण्याचे पाणी पुरवणार