जवानांच्या सतर्कतेने वाचले 5 जणांचे प्राण, दृष्य सीसीटीव्हीत कैद
मुंबई - मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणार्या लोकलने अपघात होऊन रोज अनेक प्रवाशी दगावतात. चालत्या गाडीत चढू नका, लोकलच्या दारात उभे राहुन प्रवास करु नका, यासारख्या अनेक उद्घोषणा वारंवार रेल्वेकडून करण्यात येतात. या सुचनांकडे दुर्लक्ष करुन प्रवास करण्याच्या प्रयत्नात अपघात ओढवुन घेतलेल्या काही प्रवाशांचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. प्लॅटफॉर्मवर तैनात रेल्वे सुरक्षा जवानांच्या सतर्कतेने 5 जणांचे जीव वाचु शकले आहेत. याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
मुंबईतील गोवंडी रेल्वे स्थानकामध्ये जवानांच्या सतर्कतेमुळे अपघात टळले. पहिल्या घटनेत एक महिला तिच्या 2 मुलींना लोकलमध्ये चढवते. तितक्यात लोकल सुरू झाल्याने ती देखील लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करते. मात्र लोकलचा वेग वाढल्याने ती खाली कोसळते. ही बाब लक्षात येताच रेल्वेचे जवान तात्काळ तिला लोकलपासून दुर सारत तिचा जीव वाचवतात. दुसर्या एका घटनेमध्ये एक महिला धावत्या लोकलमधून खाली पडणार तितक्यात होमगार्ड संत कुमार गुप्ता चित्रपटातील दृश्याप्रमाणे तिचा जीव वाचवतात.
धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करुन आजवर अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र आजही काही तरुण जीवावर उदार होऊन सर्रास स्टंट्स करताना दिसतात. अशाच एका स्टंटबाजाला रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखवत वाचवल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.