मुंबई : सोने-चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाल्यामुळे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने- चांदी खरेदी करणार्यांचा खिसा चांगलाच रिकामा होण्याची शक्यता आहे. कारण सोन्याचा दर प्रति तोळा 32 हजाराच्या घरात जाऊन पोहोचला. तर चांदीही 40 हजार रुपये किलोवर गेली. येत्या बुधवारी अक्षय तृतीया आहे. आणि सोनं खरेदीसाठी हा शुभ मुहूर्त मानला जातो. मात्र सोन्याचा भाव असाच चढा राहिला तर सोनं खरेदी करणार्यांचा नक्कीच हिरमोड होणार आहे. काल अमेरिकेनं सीरियावर हल्ला केल्यानंतर पश्चिम आ शियात तणाव निर्माण झालाय. त्याचा परिणाम सोनं आणि चांदीच्या दरावर झाल्याचं दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर 30 हजाराच्या घरात होता. मात्र सीरियावरच्या हल्ल्यानंतर सोन्याच्या भाव प्रतितोळा जवळपास 2 हजारानं वाढला असून तो 32 हजार 300 रूपयांपर्यंत पोहोचलाय. गेल्या काही वर्षातील अक्षय्य तृतीयेचा सोन्याचा हा सर्वाधिक भाव आहे. मुहूर्त साधून ग्राहक, उद्योजक सोने खरेदीसाठी प्राधान्य देतात. दरवर्षी कोट्यवधी रूपयांची उलाढाल अक्षय तृतीयेच्या दिवशी होते. सीरियाचा चिघळलेला प्रश्न त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पसलेली अस्थिरता, चीन-अमेरिका व्यापार युध्द याचा फटका सोने व्यापाराला बसला आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वाधिक भावाने सोन्याची विक्री होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात सोन्याच्या भावाने तीस हजारांचा टप्पा गाठला नव्हता. अहमदाबाद येथे शनिवारी विक्रमी 32 हजार 400 तोळाप्रमाणे सोन्याची विक्री करण्यात आली. ग्राहकांचा सोन्याच्या गुंतवणुकीवर विश्वास आहे. त्यामुळे भावात वाढ झाली तरी ग्राहक गुंतवणूक कायम ठेवतील, असा विश्वास व्यापारी व्यक्त करत आहेत.
सोन्या- चांदीच्या दरात उसळी सोन्याचे दर प्रति तोळा दर 32 हजारांवर!
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:47
Rating: 5