Breaking News

किसान महासंघाचा 1 जूनपासून देशव्यापी शेतकरी संप

देशभरातील शेतकर्‍यांना नवी दिशा व शेतीप्रधान देशात अनाथ झालेल्या शेतकर्‍यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय किसान महासंघाने दि. 1 ते 10 जून या काळात देशव्यापी संप पुकारला आहे. संसदेतील सदस्यांपैकी 86 टक्के सदस्य शेतीपुत्र आहेत.शेती हा व्यवसाय देशाची भूक भागवून परकीय चलन मिळवून देतो. मात्र शेती व शेतकरी शेतीमालाचे भाव ठरवू शकत नाही. कष्ट करणे एवढेच त्याच्या हातात आहे. माप मात्र दुसर्‍यांच्या हाती आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास शेती व शेतकर्‍यांचे अस्तित्वच संपून जाईल. शेती विरोधी धोरणांमुळे शेती व्यवसाय डबघाईला आला आहे. शेतीमाल मातीमोल भावाने विकला जात असल्याने कर्जबाजारीपणामुळे व लहरी हवामानामुळे शेतकरी धुळीस मिळाला आहे.