Breaking News

तालुक्यातील सुमारे 1 हजार दोनशे एकर जंगल जळून खाक आग विझविण्यासाठी अधिकारी कर्मचारी अनुपस्थित

तालुक्यातील हंडाळवाडी, कापरेवाडी व कोरेगांव हद्दीतील सुमारे 1200 एकर जंगल जळून खाक झाले. ही आग विझवण्यास देखील अधिकारी किंवा कर्मचारी येथे उपस्थित नव्हते हे विशेष. कर्जत तालुक्यातील वनविभागाचे भांडेवाडी व राक्षसवाडी वगळता सर्व क्षेत्र हे रेहकुरी वनविभागाकडे येते. हंडाळवाडी, कापरेवाडी व कोरेगाव परीसरात मोठया प्रमाणात जंगल पसरले आहे. येथील जंगलास अज्ञात इसमाने आग लावली असावी असा संशय आहे. जंगलास आग लागून सुमारे 1200 एकर क्षेत्रावरील जंगल जळून खाक झाले. या जंगलातील हजारो झाडे, छोटया मोठया ऐषधी वनस्पती, सरडे, साप, नाग, ससे, विंचू, मुगूंस, कोल्हे, लांडगे, मुग्या, पशु, पक्षी जळून मुत्यूमुखी पडले आहेत. चैकट.. उन्हाळा सुरू होताच जाळरेषा वनविभाग करत असतात. पण वनविभागाचे सर्व क्षेत्र हे रेहकुरीला जोडल्याने जाळ रेषा करण्यात आल्या नाहीत. तालुक्यातील अनेक जंगलात जाळ रेषा न केल्याने जंगले जळाली आहेत. येथील वनक्षेत्रपाल हे राज्यातील बडया मंत्र्यांचे नातेवाईक असल्याने ते घाबरत नाही. ते जंगलात फिरत ही नाहीत, त्यांना जगलाची सिमा व कोठे जंगल आहे? हेच ठाऊक नाही. एवढेच नव्हे तर पालकमंत्री राम शिंदे यांच्या बैठकीसही उपस्थित राहत नाहीत.