Breaking News

यापुढील काळातही नशाखोर तरुणांवर कठोर कारवाई करणार - पोवार


तरुण मुलांनी व्यसन करणे चुकीचे आहे. 18 ते 22 वर्षांची मुले अशी व्यसने करीत आहेत. पालकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हे व्यसनी तरुण विविध प्रकारची नशा करून गोंधळ घालून सार्वजनिक शांततेचा भंग करतात, महिला, मुलींची छेड काढतात, त्यामुळे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. आपल्याकडे अशा तक्रारी प्राप्त होत असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपण यापुढील काळात देखील अशा नशाखोर तरुणांवर कडक कारवाई करणार असल्याची पो.निरिक्षक बाजीराव पोवार यांनी माहिती दिली