Breaking News

शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी जयसिंग धोत्रे, विभाग प्रमुखपदी अरुण कळमकर

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी पारनेर तालुक्यात पक्षाचा विस्तार व्हावा हा दृटिकोन ठेवत वाडेगव्हाणचे माजी सरपंच जयसिंग धोत्रे यांची पारनेर तालुका शिवसेना उपप्रमुख पदी तर पाडळी रांजणगावचे माजी सरपंच अरुण कळमकर यांची विभागप्रमुखपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती दिली.

आमदार विजय औटी, उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, माजी सभापती गणेश शेळके, नारायणगव्हाणचे सरपंच सुरेश बोरुडे, भोयरे गांगर्डाचे सरपंच भाऊसाहेब भोगाडे, बाजार समितीचे संचालक युवराज पाटील, जातेगावचे सरपंच विठ्ठल पोटघन यांचेसह वाडेगव्हाण परिसरातील शिवसैनिकांनी नवीन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले आहे.