व्यंकटेश अपहार प्रकरणी दोन महिन्यांनी आरोपींना अटक , 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
सोनई ( प्रतिनिधी ), दि. 11, एप्रिल - नेवासा तालुक्यातील सोनई येथील नावाजलेल्या व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पथसंस्थेतील 2 कोटींचा अपहार प्रकरणी आरोपी श्यामकुमार शंकर खामकर, गणेश हरीभाऊ गोरे व गणेश अंबादास तांदळे यांना अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक करण्यात आली असून 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. लेखापाल सोमाणी यांनी दोन महिन्यांपूर्वी सोनई पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु पोलिसांच्या हलगर्जीपणामूळे आरोपी मोकाट फिरताना दिसत होते, दोन महिन्यांनी पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आले. या बाबत सविस्तर माहिती अशी की, पतसंस्थेत 2 कोटी अपहारण्यात खामकर याने ठेवीदारांचे पैसे वैयक्तिक 65 लाख रुपये , गणेश तांदळे याने बेकायदेशीर व्यवहार व वसुलपत्र 20 लाख, व गणेश गोरे याने बेकायदेशीर व्यवहार करून लाखों रुपये वैयक्तिक वापरले,प्रकरणी संस्था डबघाईला आली, त्यात ठेवीदारांनी मुदतीनंतर पैशांची मागणी केली असता पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांनी ठिय्या, उपोषण केले होते, व वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आला, त्यामध्ये ठेविदारांचे पैसे जो पर्यंत मिळत नाही तोपर्यंत होणार्या आरोपींना जामीन देऊ नये, अशी मागणी सुभाष लुनिया, व अजित बडे यांनी केली आहे, पोलीस प्रशासनाच्या आर्थिक हितसंबध व हलगर्जीपणामुळे आरोपींना पाठबळ मिळते .यामुले ठेवीदार व संस्था अडचणीत येत आहे, या अटकेमुळे आणखी काही घोटाळे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .