भेंड्यात लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
भेंडा( प्रतिनिधी ), दि. 11, एप्रिल - नेवासा तालुक्यातील भेडा येथील सालाबादप्रमाणे लोकनेते मारुतरावजी घुले पाटील क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने दि.15 एप्रिल पासून भेंडा येथे माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील चषक राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती क्रीडा प्रबोधिनिचे अध्यक्ष किशोर मिसाळ यांनी दिली. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता शास्र व कला महाविद्यालयाचे क्रीडांगणावर होणार्या या स्पर्धेला दि. 15 एप्रिल रोजी सुरवात होणार आहे.स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी अशोकराव मिसाळ यांचे कडून 51 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी परिवहन निरीक्षक संदीप मुरकुटे यांचेकडून 31 हजार रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे. प्रत्येक सामना 20 षटकांचा असेल,सहभागी होणार्या प्रत्येक संघाला 5 हजार रुपये प्रवेश फी भरावी लागणार आहे.स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघानी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष किशोर मिसाळ,प्रशिक्षक शरद दरंदले, रविंद्र डोले,समीर पठाण,नोहिद पटेल,सारंग बोरुडे यांनी केले आहे.