Breaking News

अशोकनगर महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती उत्साहात

श्रीरामपूर - प्रतिनिधी - अशोकनगर येथील अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन सर्व उपस्थितांनी केले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार, संघटन , कौशल्य, भारतीय राज्यघटना, दीन दलितांचे प्रश्‍न आदी विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.समीर सय्यद व उपप्राचार्या सौ. सुनिता गायकवाड यांनी विचार व्यक्त केला. यावेही कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुयोग थोरात, वाणिज्य विभाग प्रमुख दिलीप खंडागळे, प्रा.कैलास जाधव, प्रा.बद्रीनाथ पटारे, प्रा.वर्षा सोलापूरकर, यांनी देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयाचे वरिष्ठ, कनिष्ठ प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब पटारे, सर्व प्रशासकीय सेवक वृंद, महाविद्यालयाचे चतुर्थ श्रेणी वर्ग, सुरक्षा कर्मचारी संजय खरात यांसह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.