व्यक्तिमत्व विकास मोलाचा : राजेंद्र कुलकर्णी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळ आणि प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या व्यक्तिमत्व विकास व मुलाखतीचे तंत्र या विषयावरील कार्यशाळेस उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एस. डी. मनकर, प्रा. के. व्ही. ढमक आदी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ यांनी प्रास्तविक केले. या कार्यशाळेत शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, राहणीमान, देहबोली, भाषाज्ञान आदी गोष्टींचा बदलत्या काळानुसार सहभाग खूपच महत्वाचा असतो. याबरोबरच शारीरिक मानसिक, भावनिक, विकासातून सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडवून स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला सिद्ध करावे. सूत्रसंचालन प्रा. एस. आर. ठणगे यांनी केले.