Breaking News

पेन्शनधारकांची ७ रोजी बैठक


श्रीरामपूर प्रतिनिधी - पेन्शनधारकांना दरमहा ७ हजार रुपये पेन्शन लागू करावी, वैद्यकीय सुविधा द्याव्यात. खा. कोशियारी समिती शिफारशी प्रथम महागाई भत्त्यासह लागू कराव्यात आदी मागण्यांसाठी पेन्शनर्स संघटनेसह देशातील विविध संघटननांची बैठक दि. ७ रोजी नवीदिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार, खा. दिलीप गांधी, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे आदी उपस्थित राहणार आहेत. पेन्शनधारकांचा मोर्चा नेण्यात येणार आहे. बैठकीस व मोर्चात कन्व्हेनर धर्मराजन, अतुल दिघे, उदय भट,. म. रा. सर्व श्रमिक महासंघ चिटणीस आनंदराव वायकर, महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना अध्यक्ष गोरख कापसे, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी, कार्याध्यक्ष एस. एल. दहिफळे, उपाध्यक्ष बाबुराव दळवी, ज्ञानदेव आहेर, सुभाष काकुस्ते, देवराम पाटील, एम. आर. जाधव, व्ही. एम. पतंगराव, शरद नेहे, शिवाजी कोठवळ, बी. आर. चेडे, सुरेश सातव आदी सहभागी होणार आहेत.