Breaking News

‘प्रवरा’चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


प्रवरानगर प्रतिनिधी  बँड पथकाचा निनाद, भारतीय परंपरेतील वेशभूषा, सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकणारे रांगोळी प्रदर्शन, कल्पकतेतून बहरलेले कला प्रदर्शन, आनंदमेळा (फुड स्टॉल) आणि पारंपारिकतेसह आधुनिकतेचा संगम असलेली सांस्कृतिक संध्या अशा विविध उपक्रमांनी प्रवरा रुरल इंजिनीरिंग कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठया उत्साहात पार पडले.

यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. ‘दमलेल्या बाबांची कहानी… आणि अन्य गीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. नाटिकेच्या माध्यमातून शौचालयाचा वापर आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

संस्थेचे विश्वस्त व माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उदघाटन झाले. यावेळी गोदरेज ग्रुपचे सुजित पाटील, मायक्रोव्हिजन टेक्नॉलॉजीचे डायरेक्टर अतुल धाडीवाल, अरहाम कॉन्स्ट्रोटेक प्रा.लि. चे संस्थापक संचालक मिलिंद पारख, प्राचार्य. डॉ. यशवंत खर्डे, उपप्राचार्य प्रा. विजयकुमार राठी, प्रा. सतीष तुरकने, प्रा. अनिल लोंढे, प्रा. राहुल हिंगे, विद्यार्र्थी प्रतिनिधी प्रितीश लबडे, जी. वाय. एस. गौरव म्हस्के, अपूर्वा रोकडे आदी उपस्थित होते. प्रवरा अभियांत्रिकीच्या या वर्षीचा ‘बेस्ट आऊट गोईंग स्टुडन्ट अवार्ड’ श्रवणकुमार सिंग याला देण्यात आला.