Breaking News

प्रा. विवेक साळवे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार

भारतीय समाज विकास संशोधन संस्थेच्या खेड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयातील फिजिकल डायरेक्टर प्रा. विवेक साळवे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेटलिपटींग स्पर्धेत प्रथम व द्वितीय, पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केला. ज्युडो स्पर्धेत तृतीय क्रमांक तर कुस्ती स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

त्यांच्या कामगिरीबद्दल संस्थेचे विश्‍वस्त डॉ. प्रविण सप्तर्षी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य डॉ. एन.बी. मुदनुर, बिल्ट कंपनीचे व्यवस्थापक सोनवणे, युक्रांदचे सहकार्यवाह व महाविद्यालयीन समितीचे सदस्य आप्पा अनारसे, डॉ. धर्मेंद्र साळवे, प्रा. संदीप काळे, प्रा. शाहूराव पवार, प्रा. मनिषा लगड, ग्रंथपाल सचिन शेलार, प्रा. कुंडलिक बोडरे, लिपिक भगवान काळे, रमेश जंजिरे, अंकुश शेटे, अमोल जावळे, विठ्ठल यादव, माऊली जंजिरे, आबा भिसे आदी उपस्थित होते.