Breaking News

आदिवासी विद्यार्थ्यांकडून नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा सत्कार

कर्जत तालुक्यातील धुमकाई फाटा येथे ईश्‍वर काळे व मनिषा काळे या दांपत्याच्या प्रयत्नांतून सुरु असलेल्या यशोधरा प्रकल्पात नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम राबविण्यात आले. वसतीगृहात आयोजित केलेल्या उपक्रमांनी आदीवासी, पारधी समाजातील चिमुकल्या बालकांचा आनंद द्विगुणित झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद राऊत यांनी केले. श्रीगोंदा येथील बाळासाहेब काकडे यांच्या अग्निपंख फौडेंशनकडून यशोधरा प्रकल्पाकरीता 13 क्विंटल धान्याचे वितरण यावेळी करण्यात आले. राशिनचे भाजपाचे नेते शिवकुमार सायकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

जनतेचे प्रेम व वेळोवेळी मिळणार्‍या शुभेच्छांमुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. कार्यक्रमासाठी आदिवासी युगप्रवर्तक सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ईश्‍वर काळे, शिवकुमार सायकर, हरिश्‍चंद्र राऊत, दत्तात्रय गोसावी, डॉ. विलास राऊत, सुरज परदेशी, संस्थेच्या सचिव मनिषा काळे, व्यवस्थापक मिलिंद राऊत, कोमल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. ईश्‍वर काळे यांनी आभार मानले.