Breaking News

बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेचे आयोजन


राहाता प्रतिनिधी :- को­हाळे येथील श्री गणेश इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने 25 मार्च रोजी 10वी च्या विद्याथ्र्यांसाठी बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेमध्ये चांगले गुण मिळविणा­या विद्याथ्र्यांचा बक्षिस देवून गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी या परिक्षेसाठी जास्तीत जास्त विद्याथ्र्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन स्कूलचे संस्थापक प्राध्यापक विजय शेटे यांनी केले आहे. ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांना अत्यंत अल्पदरात विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षांची तयारी या संस्थेच्या माध्यमातून केली जाते. प्राध्यापक विजय शेटे यांनी ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांसाठी को­हाळे येथे श्री गणेश इंटरनॅशनल स्कुलचे स्थापना गेल्या दोन वर्षापासून केली. येथील विद्याथ्र्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी उच्च शिक्षीत असलेल्या शिक्षकांची या ठिकाणी नेमणुक केली. 15 एकर जागेमध्ये निसर्गमय वातावरणामध्ये या स्कूलची निर्मिती केली आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांना इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी हे स्कूल सुरु केले. या स्कूलमध्ये नर्सरी ते 12 वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्याकडून नीट, सी.ई.टी., आय.आय.टी., के.व्ही.पी.वाय., या प्रकारच्या स्पर्धा परिक्षांची तयारी 8वीच्या वर्गापासूनच सुरु केली जाते. तसेच कोपरगांव येथे श्री गणेश कोचिंग क्लासेस यांच्या माध्यमातून 11वी, 12वी विद्याथ्र्यांसाठी संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारची कोर्सेस सुरु केले आहेत.ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांसाठी या संस्थेने बसची व्यवस्था केली आहे. विद्याथ्र्यांना खेळण्यासाठी मोठे क्रिडांगण आहे. येथील विद्याथ्र्यांना डिजीटल क्लासरुम याद्वारे शिक्षण दिले जाते. अशा विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षांची तयारी या संस्थेद्वारे केली जाते. 25 मार्च रोजी 10वीची परिक्षा दिलेल्या विद्याथ्र्यांसाठी ही बुध्दीमत्ता चाचणी परिक्षा आहे. यासाठी जास्तीत जास्त विद्याथ्र्यांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.