Breaking News

मालट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

संगमनेर :  तालुक्यातील घुलेवाडी शिवारात नाशिक पुणे महामार्गावर अज्ञात ट्रक चालकाने एका दुचाकीस्वारास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी {दि. १९} सकाळी ११ च्या सुमारास घडली. याप्रकरणी शरद करू तणसे {वय २४ रा. कऱ्हे} यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यात अरुण बाळाजी निळे {वय ४० रा. नांदुरी दुमाला } हे ठार झाले. मोटारसायकलवरून ते नाशिककडे जात असताना हा अपघात झाला. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक फौजदार फटांगरे करीत आहेत.