प्रवरानगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या १२ संलग्नित महाविद्यालयांतील स्नातकांना येत्या शनिवारी {दि. २४} पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे अध्यक्षतेखाली लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर कॅम्पसमधील गंगूबाई विखे पाटील इनडोअर स्टेडियममध्ये हा पदवीदान समारंभ होणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर यांनी दिली.
‘प्रवरा’चा शनिवारी पदवीदान समारंभ
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:40
Rating: 5