Breaking News

महावितरणचा आडमुठेपणा रस्त्यावरील डीपी हलविण्यास नकार

नगरसेविका वैशाली ज्ञानेश्‍वर झेंडे यांना विकासकामे करताना प्रशासनातील काही विभागाच्या आडमुठ्या धोरणाचा फटका बसत असल्याने अनेक कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे. पालकमंत्र्यांच्या जवळील माणसांचे कामे जर होत नसतील तर मग सामान्य माणसांची काय अवस्था होत असेल? हा सवाल उपस्थित आहे. 

याबाबत सविस्तर असे की, जामखेड शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील बीएसएनएल ऑफीस ते फूलमळापर्यंतच्या रस्त्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते भुमिपूजन होऊन दिड महिन्यापूर्वी प्रत्यक्ष कामही सुरू झाले. सदर 20 फूटाच्या रस्त्यासाठी रस्ता विशेष अनुदान निधीतून तीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून निम्म्यापर्यंत काम झाले आहे. मात्र बीएसएनएल ऑफीस समोरच्या नाना पाटील यांच्या घरासमोर विजेचा खांब व त्यावरील डिपी रस्त्याच्या मध्येच उभा असून त्याच्या जमिनीला लागलेल्या ताराही रस्त्यावरच आल्या असल्याने काम थांबले आहे. नगरसेवक वैशाली झेंडे यांनी विज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना खांब हटविण्याबाबत दोन वेळा लेखी अर्ज देऊन प्रत्यक्ष वारंवार भेटूनही खांब हलविण्यास आधिकारी टाळाटाळ करीत आहेत. रस्त्याच्या कामाला आडथळा येत असेल तर स्वतःच्या खर्चाने खांब काढा असे नगरसेवक वैशाली झेंडे यांना आधिकार्‍यांनी आडमुठेपणाचे उत्तर दिल्याने रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे.