Breaking News

रस्ता डांबरीकरणाची चौकशी करावी ः एकनाथ राऊत


पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी या रस्त्यापासून कोल्हारकडे जाणारा साधारणपणे 2 ते 2.50 कि.मी रस्त्याचे डांबरीकरण मागील वर्षात सा. बांधकाम विभागातर्फे करण्यात आले. त्यापैकी अर्ध्या भागात मोठ्या खडीचे डांबरीकरण केले आहे. या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. मोठ्या खडीने डांबरीकरण करून कारपेटचे बील काढल्याची शंका देखील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कामाची सविस्तर चौकशीची मागणी महाराष्ट्र जनहित पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता एकनाथ राऊत यांनी केली आहे.