विरोलीच्या शेतकर्यांचे तहसिल कार्यालयासमोर उपोषण पारेषण कंपनीचा अनागोंदी कारभार
विरोली ( ता. पारनेर ) येथील शेतकर्याचे विविध मागण्यासाठी सोमवार दि. 19 रोजी पत्रकार संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली पारेषाण कंपनीच्या विरोधात पारनेर तहसिल कार्यालयावर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत नायब तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुपा ते वडझिरे या अतिउच्च दाबाच्या वाहिनीचे काम 2009 साली शेतकर्याची कोणतीही पुर्व परवानगी न घेता टॉवर लाईनचे फाऊडेंशन शेतकर्यांना दमदाटी करून काम केले. त्यापुर्वी कोणताही पंचनामा आणि माहिती शेतकर्यांना दिली नाही. त्यावेळी शेतकर्यांनी विरोध केल्यानंतर सदर काम बंद करण्यात आले. मात्र आता 2018 मध्ये त्यांनी पुन्हा काम सुरू केले. त्यामुळे शेतकरी वर्ग संतापला आहे. संबधीत कंपनीचे ठेकेदार शेतकर्यांना पोलिस बळ वापरण्याची धमकी देतात. ज्या क्षेत्रातून विद्युत वाहिनी जाते, त्या क्षेत्राचे नुकसानीची स्पष्ट रक्कम किती याची माहिती संबधीत ठेकेदार व आधिकार्यांकडुन दिली जात नाही. फळझाडे इतर झाडे यांच्या नुकसानीची ठोस किती नुकसान भरपाई मिळणार नाही याची कसलिही माहिती दिली जात नाही, या सर्व आनागोंदी विरोधात शेतकरी एकवटला असून सदर टॉवरलाईनचे कामाचा सर्वे चुकीच्या पद्धतीने केला असल्याची भावना शेतकर्यांची आहे. शेतकर्यांना योग्य नुकसान भरपाईची रक्कम रोख स्वरुपात योग्य मोबदला मिळवा अशी शेतकर्यांची भावना आहे.
या निवेदनावर संजय मोरे, आनंदा बुचूडे, बाबा मते, कचरू मते, लक्ष्मण बुचडे, साहेबराव मते, विमल मोरे, बाळू भागवत यांच्यासह 20 शेतकर्यांच्या सह्या आहेत.