दुधोडी ग्रामस्थांकडून शिवमंदिर जिर्णोध्दाराचा संकल्प
दुधोडीत भीमा नदीकाठी वसलेल्या शिवमंदिरासमोर सभामंडप, कोरीव नक्षीकाम केलेले शिखर, मंदिराच्या गाभार्यापर्यंत पोचण्यासाठी घाट व इतर सुविधा निर्माण करण्याचा ठराव मंजूर झाला आहे. मंदिर भिमा नदीकाठी असलेले हे मंदिर त्यामध्ये स्वयंभू अशी महादेवाची पिंड आहे. श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यास मंदीर व परिसराची शोभा वाढणार आहे. त्यामुळे याकामी मदत करण्याचे आवाहन दुधोडीच्या शिवमंदिर जिर्णोध्दार समितीकडून करण्यात आले आहे.