Breaking News

क्षयरोगदिनानिमीत्त ग्रामीण रुग्णालयामार्फत फेरी.


संगमनेर प्रतिनिधी  - जागतिक क्षयरोगदिनानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची आज प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीचे उदघाटन नगरपरिषदेच्या आरोग्य समितीच्या सभापती सोनाली शिंदे व वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजीव घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरपालिका शिक्षक मंडळाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. घोडके यांना उपस्थितांना क्षयरोगाबाबत माहिती दिली. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोणती काळजी घ्यावी, याविषयी त्यांनी सविस्तरपणे हे सांगितले. प्रशासन अधिकारी पवार यांनी उपस्थितांना मानसिक व शारिरीक आरोग्य उत्तम रहावे, याकरिता कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. या प्रभातफेरीचे नियोजन वरीष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक संदीप रुपवते व वरीष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक शेख अस्लम अब्दुलरजाक यांनी केले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, नगरपरिषद शाळांचे मुख्याध्यापक कृष्णा शिरसाठ, परविन शेख, फुलचंद लेंडे, अफ्रोजा शेख, सुमैय्या सय्यद, ज्ञानेश्‍वर माळी, सुरेखा पेटकर आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.