Breaking News

माजीमंत्री कोल्हेंचा वसा घेऊन कार्यरत : आ. कोल्हे


माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी स्वतःच्या कुटूंबापेक्षा समाज हेच कुटंब मानले. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी अविरत ८९ वर्षे परिश्रम केले. त्यांच्याच समाजकार्याचा वसा घेऊन काम करीत आहोत, असे प्रतिपादन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.

तालुक्यातील येसगांव येथे १४ व्या वित्तआयोगातून १० लाख तर ग्रामपंचायतीने स्वतः ५ असे पंधरा लाख रुपये खर्चून नूतन ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले. या कार्यालयाच्या लोकार्पणप्रसंगी त्या बोलत होत्या. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज {दि. २४} करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सभापती अनुसया होन, ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे , अनिल कदम, कुशाराम आहेर, सुधाप्पा कुलकर्णी, संजीवनी कारखान्यांचे संचालक प्रदिप नवले, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, रोहिदास होन, गटविकास अधिकारी कपिलनाथ कालोडे, विस्तार अधिकारी रानमळ, उपअभियंता घुले आणि पंचक्रोषीतील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी सरपंच शितल पाईक, उपसरपंच दिनेश कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ दत्तात्रय कोल्हे, माजी सरपंच बापूसाहेब सुराळकर आदींची भाषणे झाली. सूत्रसंचलन ग्रामविकास अधिकारी ए. पी. सय्यद यांनी केले. शेवटी सरपंच शितल पाईक यांनी आभार मानले.