Breaking News

कासार समाजाच्या कालिकादेवीचा यात्रौत्सव बुधवारपासून

राहुरी - सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र निनगुर (नेकनुर ता. जि. बीड ) येथील श्री कालिकादेवीचा यात्रौत्सव बुधवारपासून {दि. २८} सुरु होत आहे. शनिवारपर्यंत {दि. ३१} सुरु राहणाऱ्या या यात्रौत्सवात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब अंदूरे, सचिव. डाॅ सोनाजी पाटील यांनी दिली. 

सदर यात्रौत्सव काळात सकाळी सहा वाजता सप्तशती पाठ, सात वाजता कालिकादेवीस विधीवत, अभिषेक, आरती, सायंकाळी सात वाजता आरती व नैवेद्य आराधना (महाप्रसाद) होणार आहे. मुख्य चैत्र शु पोर्णिमा या दिवशी {दि. ३१} सकाळी ११ वाजता अहमदनगर येथील कालिकादेवी महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी दोन वाजता देवस्थानच्यावतीने उपस्थित समाज बांधवाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार सभेच्या अध्यक्षस्थानी महिला उद्योजक अंजली जगधने या उपस्थित राहणार आहेत. 

याप्रसंगी श्रीकांत ईटकर, अनिल अंभोरे, प्रमोद रासने, नारायण कुंभकर्ण, अभय थिटे, शिवाजी गोसावी, गिरीष अंभोरे, रमेश रासने आदी मार्गदर्शन करणार आहेत. रात्री दहा वाजता देवीचा छबिना काढण्यात येऊन यात्रेची सांगता होईल. यानिमित्त पंढरपूर येथील ह. भ. प. भागवतार्य अनुराधा शेटे या दोन दिवस {दि. २९ व ३०} दुपारी २ ते ५यावेळेत देवी भागवताचे निरूपण करणार आहेत. या उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहुन श्री कालिकादेवीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राहुरी तालुका सोमवंक्षीय क्षत्रीय कासार समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.