Breaking News

बिबट्याच्या हल्यात पाच शेळ्या दगावल्या


संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे मंगळवारी पहाटे बिबट्याने हल्ला करत शेतकरी शिवाजी बबन उंबरकर यांच्या पाच शेळ्या ठार केल्या. तर एक करडू जखमी केले. या घटनेमुळे आश्वी परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे भिती पसरली आहे.

आश्वी बुद्रुक - निमगावजाळी रस्त्यालगत {गट नं ४३०/३ मध्ये} शिवाजी बबन उंबरकर यांची शेतजमीन, राहते घर व बदिस्त जनावरांचा गोठा आहे. यामध्ये त्यांनी ६ शेळ्या बाधंल्या होत्या. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने अंधारचा फायदा घेत उंबरकर यांच्या या गोठ्यात जाऊन हल्ला करत पाच शेळ्या फस्त केल्या. यात एक करडू जखमी झाले. मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घासावरील पाणी बदलण्यासाठी उठलेल्या शिवाजी उंबरकर यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानी तात्काळ याबाबत वनविभागाला माहिती दिली. सकाळी वनविभाचे कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यानी घटस्थळी येऊन पंचनामा केला आहे. या घटनेत उंबरकर यांचे सुमारे ५५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानतंर प्रकाश उंबरकर, अशोक म्हसे, विजय म्हसे, नानासाहेब निघुते, राजु गायकवाड, बाळासाहेब म्हसे, बाबासाहेब गायकवाड, संपत शिदे आदिसह परिसरातील शेतकऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने या परिसरात पिजंरा लावून बिबट्याला जेरबंद करावे आणि उंबरकर यांना वनविभागाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली.