Breaking News

पीएनबी घोटाळा प्रकरण : बँक संघटनांचे दिल्लीत आंदोलन


नवी दिल्ली : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) सदस्यांनी बुधवारी दिल्लीत आंदोलन कले. पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला. या मुद्द्यावर हे आंदोलन करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जंतर मंतरवरील धरणे आंदोलना शिवाय, एप्रिल महिन्यात युएफबीयूच्या वतीने मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहिम राबवण्यात येणार आहे आणि या सर्व स्वाक्षर्‍या लोकसभा सभापतींना पाठविण्यात येणार आहेत. यूएफबीयूने 9 मार्चला म्हटले होते, की नुकत्याच झालेल्या पीएनबी घोटाळा प्रकरणी, घोटाळेखोरांवर कठोर कारवाई करावी. तसेच बँक कर्मचार्‍यांची छळवणूक थांबवावी, या मागणीसाठी आम्ही 21 मार्चला दिल्ली येथे धरणे आंदोलन करणार आहोत. 
पंजाब नॅशनल बँकेत गेल्या फेब्रुवारी महिन्यात 13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला होता. यात ज्वेलर आणि डिझायनर निरव मोदी आणि त्याचा मामा मेहूल चोक्सी नाहरकरत पत्रे घेऊन विविध स्त्रोतातून पैशांचा लाभ घेतला आहे. सध्या हे दोघेही देशाबाहेर आहेत.