Breaking News

दहशतवाद्यांच्या चकमकीत 4 जवान शहीद

कुपवाडा : जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये कालपासून जबरदस्त चकमक सुरू आहे. यात आत्तापर्यंत 4 दहशतवाद्यांना भारताच्या जवानांनी कंठस्नान घातले. या दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 30 तासांपासून हलमतपोरा जंगलात सुरू असलेल्या या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाचे 2 जवान व 2 पोलीस शहीद झाले आहेत. शहीद झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांचे नाव दीपक पंडीत आणि मोहम्मद युसूफ असे सांगितले जात आहे. अद्यापही या भागात चकमक सुरूच आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांचे विशेष अभियान सुरू असताना जंगलात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांच्या गटाने हल्ला केल्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली. यानंतर घटनास्थळी अतिरीक्त सैन्यबळ पाठवण्यात आले.